सावधान योजना

सावधान योजना म्हणजे काय ?

मधुमेहाचे दुष्परिणाम निरनिराळ्या इंद्रियांवर इतके हळूहळू होत असतात की त्यामुळे झालेले दोष विकोपाला जाईपर्यंत मधुमेहीस मोठा त्रास होत नाही, म्हणून तो बेसावध राहतो. पुढील अनर्थ टाळण्यासाठी काही चाचण्या नियमित करून घेतल्यास आगामी दुष्परिणामांची खूप आधी चाहूल लागून आहार - व्यायाम - औषधे या त्रिसूत्रीत योग्य तो बदल घडवून आपल्या मधुमेहाची वाटचाल आपल्याला पूर्ण ताब्यात ठेवता येते. यासाठीच आहे ही 'सावधान योजना '


ही योजना काय आहे?
या योजनेत मधुमेहासंबंधात नेहमीच्या आणि खास तपासण्या केल्या जातात, तज्ज्ञांकरवी त्यानुसार, मधुमेह नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व सल्ला दिला जातो. तसेच आहार, व्यायाम व इन्शुलिन इंजेक्शन याबाबत सर्वांगिण मार्गदर्शन केले जाते.

कोणत्या तपासण्या व मार्गदर्शन केले जाते?
१) अनशापोटी व जेवणानंतर दोन तासांनी रक्तातील व लघवीतील ग्लुकोजचे प्रमाण
२) रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण
३) एच. डी. एल. कोलेस्टेरोल
४) एल. डी. एल. कोलेस्टेरोल
५) ट्रायग्लिसराईड
६) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण
७) युरिन रूटीन
८) रक्तातील युरिया
९) क्रियाटिनीन
१०) कार्डीओग्राम (इ. सी. जी.)
११) डोळ्यांची विशेष तपासणी (रेटीनोस्कोपी)
१२) आहार चिकित्सा, माहिती व शंका समाधान
१३) व्यायामाबाबत सल्ला
१४) मधुमेही पावलांची तपासणी - पूर्व नियोजित वेळेनुसार
१५) दातांची तपासणी व सल्ला - डॉ. श्रीपाद बोकील, मंगळवार, दुपारी ३.००
                           डॉ. जयश्री महाजन, शनिवार, सकाळी ९. ०० 

कोणी व केव्हा या योजनेत भाग घ्यावा?
प्रत्येक मधुमेहिने वर्षातून निदान एकदा तरी सावधान योजनेत भाग घेऊन व सर्व तपासण्या करून घेऊन आपला मधुमेह ताब्यात असल्याची खात्री करून घ्यावी. दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या नजीकच्या मंगळवारी पूर्व नियोजित वेळेनुसार आपण जर योजनेत सहभागी व्हायचे ठरविलेत तर विसरायला होत नाही

योजनेत भाग कसा घ्यावा ?
एका दिवशी जास्तीत जास्त पाच जणांना भाग घेता येतो. त्यासाठी लवकरात लवकर खालील शुल्क भरून आरक्षण करावे. एखाद्या दिवशी जागा शिल्लक असल्यास फोन वरून वेळ व दिवस निश्चित करून घ्यावे व आधी रक्कम भरून अवश्य भाग घ्यावा. नुसत्या फोनवर आरक्षण केले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

याचे शुल्क किती ?
सभासदास रुपये १०००/- व इतरांस रुपये १२००/- रक्कम आधी भरून नाव-नोंदणी करणे आवश्यक आहे.

यात भाग घेण्यासाठी किती वेळ लागतो?
सकाळी ८-०० वाजता अनशापोटी रक्त /लघवी तपासणीसाठी यावे. त्याचवेळी ई. सी. जी. आणि पावलांची तपासणीसाठी केली जाईल. नंतर ११.३० वाजता जेवण करून दुपारी १.३० वाजता परत रक्त/लघवी तपासणीसाठी यावे व (औषधे/ इन्शुलिन नेहमीप्रमाणेच घ्यावीत. त्यात बदल करू नये ). दुपारी २ ते ५ दरम्यान डोळे तपासणी, दंत तपासणी व सल्ला, आहार- व्यायाम सल्ला, पावलांची तपासणी व डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाते.

सावधान योजना - (मुख्य शाखा ) फक्त मंगळवारी - सकाळी ८ ते सायं. ५ दरम्यान

विशेष सूचना - सावधान तपासण्या करण्याच्या आदल्या दिवशी रात्रीचे जेवण सायंकाळी ७ चे अगोदर पूर्ण करावे व त्यानंतर दुसर्‍या दिवशी लॅबोरेटरीत जाईपर्यंत पाण्याखेरीज काहीही घेऊ नये.

विशेष सूचना - 'सावधान ' योजनेअंतर्गत केल्या जाणार्‍या सर्व तपासण्यांबरोबर 'दातांची तपासणी व सल्ला' तसेच 'पावलांचा रक्तपुरवठा व संवेदना ' या नवीन दोन तपासण्या अंतर्भूत केल्या आहेत. दातांच्या तपासणीसाठी मंगळवार दुपारी ३ वाजता
डॉ. श्रीपाद बोकील  व शनिवारी सकाळी ९.०० वाजता डॉ. जयश्री महाजन व पावलांच्या तपासणीसाठी डॉ.छाया दांडेकर या मंगळवार व शनिवार सकाळी ९ ते १० या वेळेत संस्थेत येतात. आधुनिक मशिनद्वारे पावलांच्या या विशेष तपासणीसाठी रु. ४५०/- भरुन पूर्व नियोजित वेळेनुसार या सुविधेचा लाभ घ्यावा.

सावधान साठी येताना आपली सकाळची औषधे व नाष्टा सोबत आणावा कारण सकाळी तपासणीसाठी १० वाजेपर्यंत आपला वेळ जातो . 

तात्पर्य, आपल्या मधुमेहासाठी वर्षातून एक पुर्ण दिवस देणे आवश्यक आहे.


 

 
Site Designed by Brainlines